S M L

सोनू निगमने भर पत्रकार परिषदेत मुस्लीम तरुणाकडून केलं मुंडन

सोनू निगमने आज एका मुस्लिम युवकाकडून मुंडन करून टीकाकारांना उत्तर दिलं

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 03:39 PM IST

सोनू निगमने भर पत्रकार परिषदेत मुस्लीम तरुणाकडून केलं मुंडन

19 एप्रिल : मशिदीवरच्या भोंग्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या गायक सोनू निगमने आज एका मुस्लिम युवकाकडून मुंडन करून टीकाकारांना उत्तर दिलं. तसंच मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण लाऊडस्पीकर हा कोणत्याही भाग असू शकत नाही अशी ठाम भूमिकाही सोनूने मांडली.

मी मुस्लिम नाही आणि तरीही अजानच्या कर्कश आवाजानं झोपेतून का उठावं असा सवाल करत गायक सोनू निगमने नव्या वादाला तोंड फोडलं. आपल्या विधानामुळे वाद पेटल्यामुळे सोनू निगमने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

मी जन्मभर मोहोम्मद रफी यांना दैवत मानलंय. मी फक्त लाऊडस्पिकरबद्दल बोललो. मी कोणत्याही धर्माविरुद्ध नाही असं सोनू निगम म्हणाला. तसंच मंदिर असो, मशीद असो वा गुरूदवारा यातील लाऊडस्पीकरला माझा विरोध आहे. मी स्वतःला सेक्युलर समजतो. मी एका सामाजिक मुद्दयावर बोललो, धार्मिक नव्हे अशी बाजूही सोनूने मांडली.

सोनूचं जो कुणी मुंडन करेल त्याला एक लाखांचं बक्षीस दिलं जाईल असा फतवा पश्चिम बंगाल अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सय्यद शहा कादीर यांनी  काढला होता. त्यांचं चॅलेंज स्वीराकारत आज पत्रकार परिषदेत  त्याने आलीम हकीम या मुस्लीम तरुणाला बोलावून भर पत्रकार परिषदेत मुंडन केलं. तसंच आपलं वक्तव्य अर्धवट समजून घेऊन त्यावर गोंधळ घालण्यात आला, त्यामुळे मला हे असं करावं लागलं असं स्पष्टीकरणही त्याने दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close