S M L

'हॅप्पी भाग जायेगी'च्या सिक्वेलमध्ये सोनाक्षीची एण्ट्री

सोनाक्षी सिन्हानं म्हटलंय, ' हॅपी भाग जाएगीचं युनिट म्हणजे हॅपी फॅमिली आहे. मी खूपच खूश आहे. '

Sonali Deshpande | Updated On: Oct 3, 2017 12:33 PM IST

'हॅप्पी भाग जायेगी'च्या सिक्वेलमध्ये सोनाक्षीची एण्ट्री

03 आॅक्टोबर : 'हॅप्पी भाग जायेगी' सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. 'हॅप्पी भाग जायेगी रिर्टन्स' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमात डायना पेन्टीसोबत दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारे.

सोनाक्षीने डायनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली.आनंद एल राय सिनेमाची निर्मिती करतील तर मुदस्सर अजीज सिनेमाचं दिग्दर्शन करणारेत.

सोनाक्षी सिन्हानं म्हटलंय, ' हॅपी भाग जाएगीचं युनिट म्हणजे हॅपी फॅमिली आहे. मी खूपच खूश आहे. '

तर डायना पेंटी म्हणतेय, 'मी हॅपी भाग जाएगी सिनेमाचा एक भाग होते. त्यामुळे मी परत माझ्या हॅपी फॅमिलीत परतले. मला खात्री आहे शूटिंगला धमाल येणार आहे. '

सिनेमाचं शूटिंग पंजाबमध्ये या महिन्यात सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close