S M L

'बाहुबली'चा गायक रेवंत कुमार ठरला 'इंडियन आयडाॅल 9'चा विजेता

विशाखापट्टनमचा रेवंत कुमार बनला इंडियन आयडाॅल 9चा विजेता.

Sonali Deshpande | Updated On: Apr 3, 2017 03:26 PM IST

'बाहुबली'चा गायक रेवंत कुमार ठरला 'इंडियन आयडाॅल 9'चा विजेता

03 एप्रिल : विशाखापट्टनमचा रेवंत कुमार बनला इंडियन आयडाॅल 9चा विजेता. अंतिम फेरीत रेवंतचा मुकाबला होता खुदाबक्ष आणि नागा रोहितसोबत. त्यात बाजी मारली ती रेवंतनं.

आणि रेवंतला ट्राॅफी दिली ती सचिन तेंडुलकरनं. रेवंतसाठी हा क्षण फार मोलाचा ठरला. ट्राॅफीबरोबर 25 लाख रुपये आणि एक कारही त्याला मिळाली.

अंतिम सामना अटीतटीचा झाला. खरी स्पर्धा होती ती खुदाबक्षसोबत. जजेसनाही खुदाबक्ष जिंकणार असं वाटत होतं. पण जास्त मतं मिळाली ती रेवंतला. खुदाबक्षची आईनं घरकाम करून त्याला वाढवलं.

रेवंत कुमारचा आवाज नवा नाही. त्यानं 'बाहुबली'साठी गाणं गायलंय.

या शोचं मुख्य आकर्षण होता सुनील ग्रोवर. कपिलला गुडबाय करणाऱ्या  डाॅ.मशहूर गुलाटीची एन्ट्री धमाकेदार झाली. रिंकू भाभी बनूनही सुनीलनं सगळ्यांना खूप हसवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close