S M L

प्रभुदेवा करणार 'दबंग 3'चं दिग्दर्शन

पहिल्या दोन दबंग सिनेमांचं दिग्दर्शन अरबाज खाननं केलं होतं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 9, 2017 12:33 PM IST

प्रभुदेवा करणार 'दबंग 3'चं दिग्दर्शन

09 जून : अरबाज खान 'दबंग 3'चं दिग्दर्शन करणार नाही. त्याऐवजी आता या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय प्रभुदेवा. पहिल्या दोन दबंग सिनेमांचं दिग्दर्शन अरबाज खाननं केलं होतं.

दबंग 3ला सलमान खान वेळ देत नाही, म्हणून अरबाज नाराज होता. सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार, हेही नक्की होत नव्हतं. पण आता या सिनेमाचा दिग्दर्शक प्रभुदेवा निश्चित झाल्यावर  सिनेमाचं काम रुळावर यायला लागलं असं म्हणायला हरकत नाही.

सलमान सध्या 'ट्युबलाइट'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. शिवाय तो 'टायगर जिंदा है'चं शूटिंगही करतोय. त्यानंतर तो रेमो डिसुझाचा डान्स ड्रामा असलेला सिनेमा करतोय. बोनी कपूरलाही सलमानसोबत वाँटेड 2 करायचाय. पण सलमान बिझी आहे.

आता 'दबंग 3'चा दिग्दर्शक तर ठरलाय. शूटिंग कधी सुरू होतंय ते पाहायचं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close