S M L

प्रभुदेवाच्या सिनेमात झळकणार प्रभास?

'साहो' नंतर प्रभास नक्की कोणता सिनेमा करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती.मात्र आता प्रभास प्रभुदेवासोबत काम करणार असल्याची शक्यता आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 2, 2017 09:24 AM IST

प्रभुदेवाच्या सिनेमात झळकणार प्रभास?

2 जुलै: 'बाहुबली' फेम प्रभास 'साहो' सिनेमानंतर प्रभुदेवाच्या सिनेमात झळकणार असल्याचं सध्या बोलंल जातंय.'साहो' नंतर प्रभास नक्की कोणता सिनेमा करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती.मात्र आता प्रभास प्रभुदेवासोबत काम करणार असल्याची शक्यता आहे.

बाहुबलली 2च्या यशानंतर अनेक निर्माते आणि दिग्दर्शक प्रभाससोबत सिनेमा करण्यासाठी आतुर होते. साजिद नादियावालादेखील प्रभाससोबत हिंदी चित्रपट करण्यास उत्सुक होता . तसं त्याचं प्रभासशी बोलणंही झालं होत. पण त्या सिनेमाचं पुढं काय झालं हे काही कळलं नाही .पण आता प्रभास सिनेमा प्रभूदेवासोबत करू शकतो .'प्रभाससोबत सिनेमा करण्याची माझी तीव्र इच्छा आहे. सध्या तरी प्रभास त्याच्या 'साहो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.त्यानंतर आम्ही लगेचंच आमच्या सिनेमाच्या तयारीला लागणार' असं प्रभुदेवाने म्हटलंय.

या सिनेमाचं नाव काय असेल ,तो कशावर आधारित असेल याबद्दल अजून काहीही कळलेलं नाही. मात्र  त्याआाधी प्रभास प्रभुदेवाच्या खामोशी या हिंदी चित्रपटात एक कॅमिओही करू शकतो.

आता प्रभास प्रभुदेवाच्या सिनेमाला होकार देणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close