S M L

मातृदिनानिमित्त 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज, मुक्ता बर्वे आईच्या भूमिकेत

पोस्टरमध्ये मुक्ता आणि तिच्या या सिनेमातल्या दोन मुली पाउटिंग करताना दिसतायत. या दिलखुलास पोझमधून ‘आई मुलीची जिवाभावाची मैत्रीण’ असल्याचंच अधोरेखित केलं गेलंय.

Sonali Deshpande | Updated On: May 14, 2017 12:07 PM IST

मातृदिनानिमित्त 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज, मुक्ता बर्वे आईच्या भूमिकेत

14 मे : अभिनेत्री मुक्ता बर्वेने गेल्या दशकभरामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून  नाट्य-सिने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमातून ती समायरा जोशीच्या सशक्त भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका करतेय.

‘हृदयांतर’च्या आंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमित्ताने रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये मुक्ता आणि तिच्या या सिनेमातल्या दोन मुली पाउटिंग करताना दिसतायत. या दिलखुलास पोझमधून ‘आई मुलीची जिवाभावाची मैत्रीण’ असल्याचंच अधोरेखित केलं गेलंय.

मुक्ता याविषयी म्हणते, 'गेल्यावर्षी आलेल्या ‘वायझेड’ सिनेमात जरी मी आईच्या छोट्याश्या भूमिकेतून दिसले असले, तरीही त्यात आईपण अनुभवता आलं नव्हतं. ती कशीबशी अगदी पाच मिनिटांचीच भूमिका होती. मला खऱ्या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी ‘हृदयांतर’मधल्या समायरा जोशी या भूमिकेने दिली. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी नक्की किती केलं, आणि किती सोसलं त्याची जाणीव मला या भूमिकेमुळे झाली.'

मुक्ता बर्वेची आई ‘हिरोइनची आई’ या गटात मोडणारी नाही. ती मुक्ताची खरी समीक्षक आहे. त्यामुळे दोन मुलींच्या आईची भूमिका केल्यावर मुक्ताला आपल्या आईची प्रतिक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता होती.

मुक्ता म्हणते, 'विक्रमने जेव्हा तिला चित्रपटाचा फस्ट कट दाखवला तेव्हा सिनेमा संपल्यावर आई पाच मिनिटं काहीच बोलली नाही. पाच मिनिटांनी आई विक्रमकडे जाऊन म्हणाली, तुझ्या सिनेमाने मी नि:शब्द झाले. बासं, आईची ही प्रतिक्रिया सबकुछ बोलून गेली. मला आत्मविश्वास देऊन गेली.'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2017 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close