S M L

'ओ ओ जाने जाना' येतंय नव्या ढंगात

कमाल खानने अशी घोषणा केली की तो 'ओ ओ जाने जाना'चा रिमेक लवकरच घेऊन येणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 17, 2017 04:20 PM IST

'ओ ओ जाने जाना' येतंय नव्या ढंगात

17जुलै : हल्ली बॉलिवूडमध्ये रिमिक्सचा जमाना चालू आहे. सगळी जुनी गाणी नव्या ढंगात नव्या रंगात आणि रूपात येत आहेत. मग ते गीता दत्तचं 'फिफी' असेल किंवा श्रीदेवीचे 'हवाहवाई'. आता सलमानचंही 'ओ ओ जाने जाना' हे गाजलेलं गाणं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येतंय.

नुकताच आयफाचा दिमाखदार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या सोहळ्यात ओ ओ जाने जाना हे गाणं गाणाऱ्या 'कमाल खान' या गायकाने परफॉर्म केलं. त्यानंतर कमाल खानने अशी घोषणा केली की तो 'ओ ओ जाने जाना'चा रिमेक लवकरच घेऊन येणार आहे. ज्या गाण्यामुळे सलमान अनेक मुलींच्या 'दिल की धडकन' झाला ते गाणं गायल्यावर अजूनही जुन्या आठवणी ताज्या होतात असं कमाल खानचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच त्याने या जुन्या गाण्याचा रिमेक करायचं ठरवलंय.

आता हे गाणं तो कुठल्या अल्बमसाठी गाणार आहे की नव्या मुव्हीसाठी हे त्यानं स्पष्ट केलेलं नाही. पण लवकरच तो हे गाण नव्या रूपात आणि ढंगात घेऊन येणार हे मात्र निश्चित. या गाण्यावर त्यानं काम करायला सुरूवातही केलीय. तसंच अजूनही काही प्रोजेक्ट्वर तो काम करतोय.

एकेकाळी प्रचंड गाजलेलं हे गाणं आता नव्या ढंगात कसं असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close