S M L

'माझा कार्यक्रम फक्त भारतीयांसाठीच', मिकाचं स्पष्टीकरण

"ह्युस्टन आणि शिकागो इथं होणारा कार्यक्रम हा फक्त भारतीयांसाठी करतोय, माझ्यासाठी माझा देश प्रथम आहे "

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2017 07:19 PM IST

'माझा कार्यक्रम फक्त भारतीयांसाठीच', मिकाचं स्पष्टीकरण

05 आॅगस्ट : 'हमारा पाकिस्तान' म्हणून गायक मिका सिंगने ओढावून घेतलेल्या वादावर अखेर खुलासा केलाय. ह्युस्टन आणि शिकागो इथं होणारा कार्यक्रम हा फक्त भारतीयांसाठी करतोय, माझ्यासाठी माझा देश प्रथम आहे असं स्पष्टीकरण मिका सिंगने दिलंय..

भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून  ह्युस्टन आणि शिकागो येथे 12 आॅगस्ट रोजी मिका सिंगच्या लाईव्ह काॅन्सर्टचं आयोजन करण्यात आलंय. मागील महिन्यात त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून ह्युस्टन आणि शिकागो इथं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं असं जाहीर केलं. मात्र, यावेळी त्याने हमारा पाकिस्तान म्हणून वाद ओढावून घेतला. मनसेनं मिकाच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत मिकाने मुंबईत माईक हातात घेऊनच दाखवावा असा इशारा दिला होता. एवढंच नाहीतर आज त्या विरोधात आंदोलनही करण्यात आलं.

अखेर या वादानंतर आज मिकाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं.  ह्युस्टन आणि शिकागो इथं होणारा कार्यक्रम हा फक्त भारतीयांसाठी करतोय.  मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी माझा देश सर्वात प्रथम आहे आणि मग पाकिस्तान.. याबद्दल मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमेय खोपकर यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना हा शो भारतीयांसाठी आहे असं सांगितलं असंही त्याने सांगितलं.

परंतु, मिकाने 'हमारा पाकिस्तान' या विधानावर बोलण्याचं मात्र टाळलं. त्यामुळे मनसे आता काय भूमिका घेत याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

मिकासिंगचे स्पष्टीकरण

"तीन चार दिवस माझ्याबाबत विनाकारण वाद सुरू आहे. मी ह्युस्टन आणि शिकागो येथे पाकिस्तानी कलाकारांसोबत शो करणार आहे हे साफ चुकीचे. मी हा शो फक्त भारतीयांसाठी करतोय. 12 तारखेला ह्युस्टन आणि 13 तारखेला शिकागो येथे शो आहे. मी हे शो कुणासाठी केले याचे व्हिडिओ देखील जारी कऱणार आहे. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी माझा देश सर्वात प्रथम आहे आणि मग पाकिस्तान... आताच माझी मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना मी सांगितलंय की, मी फक्त भारतीयांसाठी शो करणार. राज ठाकरे यांना देखील मी तेच सांगतोय की माझा शो भारतीयांसाठी असेल. जयहिंद जय महाराष्ट्र, मी मराठी माणसासाठी..."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close