S M L

अभिनेते मोहन जोशींना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

५ नोव्हेंबरला रंगभूमीदिन आहे, त्या दिवशी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते मोहन जोशींचा गौरव केला जाणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 8, 2017 06:11 PM IST

अभिनेते मोहन जोशींना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

08 आॅक्टोबर : विख्यात अभिनेते मोहन जोशींना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झालाय. ५ नोव्हेंबरला रंगभूमीदिन आहे, त्या दिवशी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते मोहन जोशींचा गौरव केला जाणार आहे.

जोशी यांनी गेल्या ४ दशकांत मराठी रंगभूमीवर अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या.पुरुष, नातीगोती, मी रेवती देशपांडे, गाढवाचं लग्न, कलम ३०२, कार्टी काळजात घुसली, नाथ हा माझा, सुखांत आणि तरुण तुर्क म्हातारे अर्क.. अशा एकापेक्षा एक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं.

मराठी आणि हिंदी चित्रपटांचीही त्यांची यादी मोठी आहे. सवत माझी लाडकी, आपली माणसे, शस्त्र, तू तिथे मी, घराबाहेर, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.तर वास्तव, गंगाजल, बागबान, यंशवंत, मृत्यूदंड अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2017 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close