S M L

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मिका सिंगचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

मुंबईत गायक मिका सिंगविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केलं

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2017 05:54 PM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मिका सिंगचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

05 आॅगस्ट : मुंबईत गायक मिका सिंगविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केलं. दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिका सिंगचा पुतळा जाळला.

गायक मिका सिंगला पाकिस्तान प्रेमाचं भरतं आलंय.पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या 'हमारा पाकिस्तान' या कार्यक्रमात मिका सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात मिका पाकचे गोडवे गाणार असल्यामुळे मिकावर सर्व स्तरांमधून टीका होतीये. मिकाच्या या निर्णयावर आता मनसे चित्रपट सेनेने जाहीर विरोध केलाय.

पाकचे गोडवे गाणाऱ्या मिकाने मुंबईत परतल्यावर हातात माईक धरून दाखवावं असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय. आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसरात मिका सिंगचा पुतळा जाळून जोडे मारो आंदोलन केलंय. यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close