S M L

मानसी नाईकचा गोल्ड बिकिनीमधला फोटो व्हायरल

मानसी नाईकनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नुकताच गोल्ड बिकिनीमधला तिचा एक फोटो अपलोड केलाय. ह्या बिकिनीत ती भलतीच हॉट आणि बोल्ड दिसतेय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 11, 2018 06:05 PM IST

मानसी नाईकचा गोल्ड बिकिनीमधला फोटो व्हायरल

11 जानेवारी : एकीकडे बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या बोल्ड अदा चर्चेचा विषय ठरत असताना मराठी मुलीही त्यात अजिबात मागे नाहीत. मानसी नाईकनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नुकताच गोल्ड बिकिनीमधला तिचा एक फोटो अपलोड केलाय. ह्या बिकिनीत ती भलतीच हॉट आणि बोल्ड दिसतेय. मानसीच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने लाईक तर केलंच आहे. पण बोल्डनेसच्या बाबतीत हम भी किसी से कम नहीं हेच तिने दाखवून दिलंय.

मानसी नाईक अभिनयासोबत उत्तम नर्तिकाही आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तिचे रिक्षावाला हे गाणे तुफान गाजले. मानसीने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. कॉलेजच्या दिवसांपासूनच तिने मॉडेलिंग सुरू केलं होतं. शाळेच्या दिवसांत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी मानसी आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.

मानसी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह आहे आहे तिच्या फॅन्ससाठी तिचे अनेक फोटोज् वेळोवेळी शेअर करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close