S M L

दिग्गजांनी वाहिली रीमा लागूंना श्रद्धांजली

रीमाच्या निधनाची दखल अनेक दिग्गजांनी घेतली. पंतप्रधान, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर सगळ्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलंय. पाहू या काही ट्विट्स

Sonali Deshpande | Updated On: May 18, 2017 02:39 PM IST

दिग्गजांनी वाहिली रीमा लागूंना श्रद्धांजली

18 मे : रीमा लागूंची एक्झिट तशी अचानकच. म्हणून जास्त चटका लावून जाणारी. कालपर्यंत त्या शूटिंगमध्ये बिझी होत्या. बाॅलिवूड, मराठी सिनेमा, हिंदी मालिका सगळीकडे त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रत्येक भूमिका , व्यक्तिरेखा त्या अक्षरश: जगल्या.

बाॅलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून ओळख मिळाली होती, तरी त्या नेहमीच सर्वसामान्यांशी संवाद साधत. म्हणूनच गेल्या महिन्यात त्या गिरगावमध्ये आल्या होत्या. तिथे स्थानिक शिवसेना शाखेनं त्यांना 'कट्टर गिरगावकर' हा पुरस्कार दिला.

रीमाच्या निधनाची दखल अनेक दिग्गजांनी घेतली. पंतप्रधान, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर सगळ्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलंय. पाहू या काही ट्विट्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2017 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close