S M L

काजोल पुन्हा तामीळ सिनेमात

काजोल आता एका तामीळ सिनेमात काम करणार आहे .या सिनेमात ती आणि धनुष प्रमुख भूमिकेत आहेत .

Sonali Deshpande | Updated On: Jun 26, 2017 11:49 AM IST

काजोल पुन्हा  तामीळ सिनेमात

26 जून : हिंदी सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी 'डी. डी. एल. जे'. ची सिमरन अर्थात काजोल आता एका तामीळ सिनेमात काम करणार आहे .या सिनेमात ती आणि धनुष प्रमुख भूमिकेत आहेत .

या सिनेमाचे नाव 'व्ही आय पी2' (वेल्ल इल्ल पट्टधारी 2 ) आहे .हा सुपरहिट 'व्ही आय पी' चा सिक्वेल आहे . या सिनेमात धनुष 'रघुवरन' नावाच्या बेरोजगार पदवीधराच्या भूमिकेत आहे तर काजोल एका धूर्त उद्योजिकेच्या भूमिकेत आहे.या सिनेमाचा  ट्रेलर नुकताच रिलीज झालाय.

हा सिनेमा म्हणजे या दोघांच्या टाईट फाईटमधून उलगडणारी एक अफलातून कॉमेडी आहे.यांच्याशिवाय अमाला पौल,समुथीरकणी आणि विवेकही महत्वाच्या भूमिकेत आहेत .

या सिनेमाचे दिग्दर्शन धनुषच्या बायकोने आणि रजनीकांतच्या मुलीने -'सौंदर्या रजनीकांत'ने केलंय.हा चित्रपट 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या चित्रपटातून काजोल 20 वर्षांनंतर तामीळ चित्रपटात परत येतेय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close