S M L

पाहा 'तो' व्हिडिओ ज्याने जस्टिनचे आयुष्य बदलून टाकले

"जस्टिन १२ वर्षांचा असताना त्याने विख्यात गायक क्रिस ब्राउन यांचं ' विथ यू ' हे गाणं गाऊन रेकॉर्ड केलं होतं"

Sachin Salve | Updated On: May 10, 2017 07:00 PM IST

पाहा 'तो' व्हिडिओ ज्याने जस्टिनचे आयुष्य बदलून टाकले

10 मे : जस्टिन बिबर एका कॉंन्सर्टसाठी मुंबईत आलाय. त्याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केलीये. जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या गायकांमध्ये जस्टिनचं नाव सर्वात आघाडीवर आहे. पण जगभरातील तरूणाईवर मोहिनी घालणाऱ्या या पॉपस्टारची सुरुवात नेमकी कशी झाली, हे आपण जाणून घेऊयात..

खरंतर जस्टिनला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्याची आई पॅटी मॅलीट ह्या जस्टिनने गायलेल्या गाण्यांचे व्हिडिओ काढून ते युट्यूब वर अपलोड करत असत. जस्टिन १२ वर्षांचा असताना त्याने विख्यात गायक क्रिस ब्राउन यांचं ' विथ यू ' हे गाणं गाऊन रेकॉर्ड केलं होतं. जस्टिनने गायलेलं हे गाणं नंतर यूट्यूब वर खूपच व्हायरल झालं. आणि हाच जस्टिनच्या आयुष्यातील टर्निंग पाँईंट ठरला. कारण त्याचवेळी बिझनसमन असलेले स्कुटर ब्राउन हे नव्या गायकांच्या शोधात होते. जस्टिनचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी जस्टिनला शोधून काढलं. पुढे अनेक मोठ्या गायकांमध्ये जस्टिनला साइन करण्यासाठी चढाओढ लागली. तेथूनच मग जस्टिन तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवू लागला.

आतादेखील मुंबईत होणाऱ्या त्याच्या कॉन्सर्टसाठी देशभरातील तरूण-तरूणींनी मोठी गर्दी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 07:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close