S M L

छोट्या पडद्यावर अक्षयची सलमानवर बाजी

अक्षयच्या 'जाॅली एलएलबी 2' या सिनेमाने सलमान खानच्या 'सुलतान'ला आणि हृतिक रोशनच्या 'काबील' या सिनेमाला टीआरपी रेटिंगमध्ये मागे टाकलंय.

Sonali Deshpande | Updated On: May 29, 2017 03:26 PM IST

छोट्या पडद्यावर अक्षयची सलमानवर बाजी

 29 मे : टीव्हीवरील टीआरपीच्या लढाईत अक्षय कुमारने जॉली बनत सलमान खानला मागे टाकलंय. याबाबत फॉक्स स्टारचे सीईओ असलेल्या विजय सिंग यांनीच एक स्टेटमेंट केलंय. ते म्हणाले की, 'जॉली एल एल बी- २' या अक्षयच्या सिनेमाला टीव्हीवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.

काही दिवसांपूर्वीच 'जॉली एल एल बी- २' या सिनेमाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर ठेवण्यात आलेला. या सिनेमाचं प्रसारण स्टार वाहिनीवर करण्यात आलं होतं. आणि आता या सिनेमाचे रेटिंग समोर आलं आहे. त्यानुसार अक्षयच्या या सिनेमाने सलमान खानच्या 'सुलतान'ला आणि हृतिक रोशनच्या 'काबील' या सिनेमाला टीआरपी रेटिंगमध्ये मागे टाकलंय. तर 'जॉली एल एल बी- २' हा सिनेमा हा या टीआरपीच्या रेसमध्ये नंबर-१ ठरलाय.

या सिनेमाला ३.८३ रेटिंग मिळालीय. तर दुसरीकडे सुलतानला (3.32), ढिशूमला (2.79), द जंगल बुक (2.39), काबिल (2.37) यांना रेटिंग मिळालीय.

बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या या सिनेमाने जवळपास १२० कोटींचा गल्ला कमावलेला. तर या सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं होतं, तेच या सिनेमाचा पहिला पार्ट असलेल्या 'जॉली एल एल बी'चेही दिग्दर्शक होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close