S M L

ठाकरे कुटुंबीयांचे 'बाळासाहेब ठाकरे' पडद्यावर

तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे याने केलंय. या सिनेमातून राहुल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 1, 2017 10:22 AM IST

ठाकरे कुटुंबीयांचे 'बाळासाहेब ठाकरे' पडद्यावर

01 ऑक्टोबर: स्मिता ठाकरे आणि राहुल ठाकरे निर्मित 'बाळासाहेब ठाकरे' हा हिंदी सिनेमा रिलीजसाठी आता सज्ज झालाय. दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचं टिझर लाँच करण्यात आलं आहे.

तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे याने केलंय. या सिनेमातून राहुल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेला बाळासाहेब हा सिनेमा येऊन गेला आहे. मात्र ठाकरे कुटुंबियांकडून हा पहिलाच सिनेमा आहे जो बाळासाहेबांवर आधारित आहे. राहुल आणि स्मिता ठाकरे यांनी या सिनेमासाठी राज ठाकरे यांचसुद्धा मार्गदर्शन घेतलं आहे.बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close