S M L

सलमानच्या आवाजातला नवा हनुमान 'दमदार'

'हनुमान द दमदार' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. आणि हा अॅनिमेटेड सिनेमा आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 05:55 PM IST

सलमानच्या आवाजातला नवा हनुमान 'दमदार'

19 एप्रिल : 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी' हा डायलाॅग आहे हनुमानाचा आणि तोही सलमानच्या आवाजात.  'हनुमान द दमदार' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. आणि हा अॅनिमेटेड सिनेमा आहे. यात सलमान खानचा आवाज आहे आणि त्याचे लोकप्रिय डायलाॅग्जही.

सलमान खाननं 'बजरंगी भाईजान'मध्ये हनुमान भक्त बनून आपल्या फॅन्सना खूश केलं होतं. त्यात त्यानं हनुमान चालिसा वाचलंय, हनुमानाचं लाॅकेटही घातलंय.

या सिनेमात सलमान खानसोबत रवीना टंडन,मकरंद देशपांडे, जावेद अख्तर,सौरभ शुक्ला आणि कुणाल खेमू यांनीही आवाज दिलाय.

आता शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यात. म्हणूनच बच्चे कंपनीसाठी हा ट्रेलर रिलीज केलाय. सिनेमा 19 मे रोजी रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close