S M L

कोण आहेत बाॅलिवूडचे सर्वात श्रीमंत अभिनेते?

शाहरूख खान सिनेमाबरोबरच ब्रँडसच्या जाहिराती करून पैसे कमावतो. त्याचं उत्पन्न आहे 2 अब्ज 43 कोटी रुपये. तर सलमानचं उत्पन्न आहे 2 अब्ज 37 कोटी रुपये. अक्षय कुमार वर्षाला 2 अब्ज 27 कोटी कमावतो.

Sonali Deshpande | Updated On: Aug 23, 2017 05:22 PM IST

कोण आहेत बाॅलिवूडचे सर्वात श्रीमंत अभिनेते?

23 आॅगस्ट : बाॅलिवूडमध्ये सर्वात श्रीमंत अभिनेते कोण आहेत ठाऊकेय? नुकतीच फोर्ब्स मॅगझीननं जगातल्या श्रीमंत अभिनेत्यांची यादी जाहीर केली. त्यात शाहरूख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार आहे. पण आश्चर्य म्हणजे आमिर खानचं नाव पहिल्या दहात नाही.

यावर्षी शाहरूखचा 'रईस' आणि 'जब हॅरी मेट सेजल' दोन्ही सिनेमे फार चालले नाहीत. तर सलमान खानचा 'ट्युबलाईट' ही आपटला होता.

या यादीत शाहरूख खान 8व्या नंबरवर आणि सलमान खान 9व्या स्थानावर आहे. 'जाॅली एलएलबी 2' आणि 'टाॅयलेट एक प्रेमकथा' हिट होऊनही अक्षय कुमार 10व्या नंबरवर आहे.

शाहरूख खान सिनेमाबरोबरच ब्रँडसच्या जाहिराती करून पैसे कमावतो. त्याचं उत्पन्न आहे 2 अब्ज 43 कोटी रुपये. तर सलमानचं उत्पन्न आहे 2 अब्ज 37 कोटी रुपये. अक्षय कुमार वर्षाला 2 अब्ज 27 कोटी कमावतो.

आमिर खान वर्षाला एकच सिनेमा करतो. शिवाय तो जास्त जाहिरातीही करत नाही. त्यामुळे तो या यादीत नसावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close