S M L

वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्यानं सलमान खान आणि शिल्पा शेट्टीवर गुन्हा दाखल

सलमान आणि शिल्पाने 'भंगी' या शब्दाचा वापर केल्याने नवीन रामचंद्र लाडी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2017 06:23 PM IST

वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्यानं सलमान खान आणि शिल्पा शेट्टीवर गुन्हा दाखल

23 डिसेंबर : बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि शिल्पा शेट्टीवर अनुसूचित जाती-जमातींच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान आणि शिल्पाने 'भंगी' या शब्दाचा वापर केल्याने नवीन रामचंद्र लाडी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवीन रामचंद्र लाडी हे नवीन रोजगार अगहरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महासचिव आणि अनुसूचित जाती-जमातींचे सदस्य आहेत.

नवीन यांच्या वकीलानुसार, 'कतरीनासोबत सलमान खान एका टीव्ही शोमध्ये गेला होता. त्यात सलमान आणि शिल्पाने 'क्या मै भंगी जैसे दिखती हूं' अशा वाक्याचा वापर केला आणि अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांच्या भावना दुखावल्या.' म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरं तर सलमान आणि शिल्पाचा हा व्हिडिओ जूना आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय गाजला आणि त्यांच्या याच व्हिडिओमुळे ते दोघेही चांगलेच वादात सापडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close