S M L

शिल्पा शेट्टीचे फोटो काढले म्हणून दोन फोटोग्राफर्सला मारहाण

शिल्पा शेट्टी आणि राज कूंद्रा रात्री बोस्टियन हॉटेलमधून बाहेर पडत असताना हा प्रकार घडलाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 8, 2017 12:37 PM IST

शिल्पा शेट्टीचे फोटो काढले म्हणून दोन फोटोग्राफर्सला मारहाण

मुंबई,08 सप्टेंबर:  शिल्पा शेट्टीचे फोटो काढले म्हणून  माध्यमांच्या दोन फोटोग्राफर्सना बेस्टियन हॉटेलच्या बाऊंसर्सनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कूंद्रा रात्री बोस्टियन हॉटेलमधून बाहेर पडत असताना हा प्रकार घडलाय.

गुरूवारी रात्री शिल्पा शेट्टी हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढले होते. शिल्पा शेट्टी कारमध्ये बसुन निघाल्यावर हॉटेलच्या बाउंसर्सनी या फोटोग्राफर्सना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यानंतर हॉटेलच्या बाऊंसर्सनी त्यांना मारहाण केली. यात दोन फोटोग्राफर्स जखमी झाले आहेत.

याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close