S M L

बिग बींनी ट्विट केला केबीसीचा पहिला प्रोमो

अमिताभ बच्चन लिहितात, ' 17 जून रात्री 9 वाजल्यापासून सुरू होतील माझे प्रश्न आणि तुमचं रजिस्ट्रेशन.'

Sonali Deshpande | Updated On: Jun 12, 2017 12:13 PM IST

बिग बींनी ट्विट केला केबीसीचा पहिला प्रोमो

12 जून : महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 9'ची हवा सुरू झालीय. बिग बी आपल्या नेहमीच्या स्टाइलिश अंदाजात प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. अनेक जण फक्त अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी या शोमध्ये भाग घेतात. या शोचा पहिला प्रोमो बिग बींनी ट्विट केलाय.

या गेम शोच्या रजिस्ट्रेशनची तारीख 17 जून आहे. रात्री 9 वाजल्यापासून हे रजिस्ट्रेशन सुरू होईल.

अमिताभ बच्चन लिहितात, ' 17 जून रात्री 9 वाजल्यापासून सुरू होतील माझे प्रश्न आणि तुमचं रजिस्ट्रेशन.'

'केबीसी इज बॅक' म्हणत बिग बींनी शोचं पोस्टरही ट्विट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close