S M L

पहिला बाहुबली पुन्हा एकदा रिलीज

7 एप्रिल रोजी बाहुबलीचा पहिला भाग काही थिएटर्समध्ये रिलीज होणारेय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 6, 2017 04:44 PM IST

पहिला बाहुबली पुन्हा एकदा रिलीज

06 एप्रिल : बाहुबली या सुपरहिट सिनेमाला रिलीज होऊन दोन वर्ष झाली तरी त्याचा क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. उद्या 7 एप्रिल रोजी बाहुबलीचा पहिला भाग काही थिएटर्समध्ये रिलीज होणारेय.

सिनेमाचा दुसरा भाग येत्या 28 एप्रिल रोजी रिलीज होणार असल्याने सिनेमाची चर्चा अधिक वाढलीय. याचाच फायदा सिनेमाच्या निर्मात्यांनी घेण्याचं ठरवलंय.त्यांनी सिनेमाचा हा पहिला भाग पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय.

हा भाग येत्या 7 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर पुन्हा रिलीज होतोय.  याचसोबत दोन्ही भागांची  तिकिटं एकत्र घेतल्यावर काही ऑफर मिळणार असल्याचंही समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close