S M L

'दंगल'साठी आमिर खानला मिळणार दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

या वर्षीच्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाची निवड करण्यात आली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 02:54 PM IST

'दंगल'साठी आमिर खानला मिळणार दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

19 एप्रिल : या वर्षीच्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी आमिर खानच्या 'दंगल' सिनेमाची निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्री वैजयंती माला आणि क्रिकेटर कपिलदेव यांनाही यंदाच्या दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

दरवर्षी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. जो कलाकार त्याच्या आवडत्या क्षेत्रात उत्तम पद्धतीने काम करतो आणि आपली एक वेगळीच छाप उमटवतो त्यालाच या विशेष पुरस्काराने सन्मानित केलं जातं.

'दंगल' सिनेमामुळे समाजातील एका मोठ्या वर्गावर सखोल परिणाम झाला आहे. म्हणूनच या सिनेमाची निवड या विशेष पुरस्कारासाठी करण्यात आली, असं ७५ व्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी म्हटलंय. सध्या आमिर खान चीनमध्ये असून तिथे दंगल सिनेमा ५ मे रोजी रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close